बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२

शेळीपालन अनुदान योजना sheli palna anudan yojna2022.

 शेतीला पूरक व्यावसाय म्हणून शेळीपालन करायचे तर असा करा अर्ज...!

चला तर मग शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ संपूर्ण माहिती...!

 भारत हा कृषि प्रधान देश आहे तसेच भारतात बहुतेक कुटुंबाचा उदरनिर्वाह हा केवळ शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहे. जनावरांची शेती लोकांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यास मदत करते त्यातच आता शेळी पालन योजना 2022 देखील भारतात खूप प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्रात शेळी पालन योजनेसाठी (Maharashtra Sheli Palan Yojana 2022) ऑनलाइन अर्ज कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती आम्ही आपल्याला या पोस्ट मध्ये सांगणार आहोत, विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत वाचावा.

महाराष्ट्रात शेळीपालन करण्यासाठी हवामान अतिशय अनुकूल आहे. पात्रता असलेल्या शेतकर्‍यांना अनुदान देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नॅशनल बँकेचे कृषी व ग्रामीण विकास संस्था देखील सहकार्य करीत आहे. लोकांना शेळी पालन करण्यास प्रवृत्त करणे हे Sheli Palan Anudan Yojana 2022 चे मुख्य उद्दीष्ट आहे. खादी ग्रामोद्योग व संबंधित संस्थांकडून शेळी पालन संबंधित सर्व माहिती जसे की बकरीच्या जाती, त्यांची वैशिष्ट्ये, आहार, त्यांना राहण्यासाठी शेड आणि रोग आणि उपचारांविषयी अचूक माहिती तुम्हाला सांगतील. शेळी पालन 2022 या योजनेसाठी सरकार कडून अनुदान देखील मिळत असते परंतु अर्जदारस त्यासाठी पात्र असावे लागते. Sheli Palan Yojana 2022


 साठी पात्रता काय लागते त्याची देखील माहिती आम्ही खाली सांगितली आहे.

या लिंक वर जाऊन आपण अर्ज करू शकता:-https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en

सर्वांना माहितच आहे की महाराष्ट्र सरकार राज्यातील रहिवाशांना नवीन रोजगार सुरू करण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन देते. ज्यामुळे शेतकर्‍यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतात. अशा कर्जांवर सरकार कडून अनुदानही देण्यात येते, जेणेकरून कुणावरही कर्जाचा बोजा पडणार नाही. म्हणूनच आर्थिक दृष्ट्या शेळी पालन हा खूप महत्वाचा व्यवसाय आहे.

राज्यातील शेतकर्‍यांना शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी    प्रोत्साहित करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. ज्यामुळे छोट्या व        सीमान्त शेतकर्‍यांना मदत मिळते.

 शेळी पालन करण्यासाठी लागणारी पात्रता कोणती?

लाभार्थ्याकडे मॉडेल प्रोजेक्ट अहवाल असावा - त्यामध्ये बकरी विकत घेतल्याबद्दल बकरीची खरेदी किंमत, घर खर्च आणि लाभांश दर्शविला जाणे आवश्यक आहे.

जमीन - 100 बकर्‍यांसाठी 9000 चौ.मी. असावी अर्ज करताना, जमीन भाड्याची पावती / एलपीसी / लीज कागदपत्रे, जागेचा नकाशा तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. 

रक्कम - लाभार्थ्याला त्याच्या वतीने दोन लाख रुपये गुंतवावे लागतील. जर शेतकरी कर्ज घेण्यास तयार असेल तर त्याच्याकडे 1 लाख रुपयांचा चेक / पासबुक / एफडी किंवा कर्ज घेण्यासाठी इतर कोणत्याही प्रकारचे पुरावे असले पाहिजेत.

शेळी पालनासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

  • आधार कार्ड,

  • पॅनकार्ड,

  • अर्जदाराचे छायाचित्र,

  • राहण्याचा दाखला,

  • जात प्रमाणपत्र.
Sheli Palan Yojana 2022 साठी अर्ज करायचा असेल तर तो तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. कारण महाराष्ट्र सरकार कडून अद्याप सुद्धा बकरी पालन योजना 2022 साठी ऑनलाइन अर्ज प्रणाली चालू करण्यात आली नाही. खलील प्रकारे तुम्ही sheli palan yojana 2022 साठी अर्ज करू शकता.

सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र सरकार च्या आपले सरकार पोर्टल वर जावे लागेल आणि तिथून सर्व माहिती मिळवावी लागेल.
तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत शी सुद्धा संपर्क करू शकता.

sheli palan yojana 2022 pdf form तुम्हाला ग्रामपंचायत किंवा बँकेत सुद्धा मिळेल. आम्ही खाली पीडीएफ लिंक दिली आहे त्यावरून सुद्धा तुम्ही sheli palan yojana 2022 pdf form download करू शकता.

sheli palan yojana 2022 pdf form download करून तुम्हाला तो भरावा लागेल आणि संबंधित विभागामध्ये जमा करावा लागेल.

वरील प्रमाणे शेळी पालन योजनेअंतर्गत अर्ज करत असताना काही अडचण आल्यास आम्हाला कॅमेन्ट करून नक्की कळवा.आम्ही आपली पूर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न करू.

माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका..😊👍

२ टिप्पण्या:

मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

  प्रत्येक मराठ्यापर्यंत ही कविता पोहोचलीच पाहिजे त्याशिवाय मराठ्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही. मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय? का...