केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनेमधीलच पीएम किसान ही एक योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 3 हप्त्यामध्ये 6 हजार रुपये दिले जातात.
आपण पाहिले तर सरकारकडून निश्चित करण्यात आलेली ई-केवायसीची अंतिम मुदतही संपली आहे. अनेक लाभार्थी शेतकऱ्यांची ई-केवायसी 31 ऑगस्टपर्यंत झालेली नाही.
प्रधान सचिव डॉ. अरुण कुमार मेहता यांनी पीएम किसान योजनेच्या दिलेल्या माहितीनुसार 12 वा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक केलेल्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल.
सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा करण्यात येईल असेही डॉ. अरुण कुमार मेहता यांनी म्हंटले आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, यावेळी सरकारचे मुख्य लक्ष अपात्र लाभार्थ्यांचा लाभ थांबवणे आणि पैसे वसूल करणे हा आहे.
विशेष म्हणजे जे शेतकरी पात्र आहेत. त्या शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण झाल्याशिवाय हप्ता दिला जाणार नाही. केंद्र सरकारने (central government) जेव्हापासून या योजनेसाठी ई-केवायसी आवश्यक केलीआहे, तेव्हापासून या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सातत्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे.
source:- कृषी जागरण
.jpeg)
💯💯💯
उत्तर द्याहटवाThanks
उत्तर द्याहटवा