बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना कामगार योजने अंतर्गत शासकीय अर्थ साहाय्य किती मिळते.? ते कसे मिळवावे.? या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या....!





बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना कामगार योजने अंतर्गत शासकीय अर्थ साहाय्य किती मिळते.? ते कसे मिळवावे.? या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या....!


नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता १ली ते ७वी मध्ये किमान ७५ टक्के किंवा अधिक गुण असल्यास २५००/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाते. ७५ टक्के हजेरीबाबतचा शाळेचा दाखला.

नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता ८वी ते १०वी मध्ये किमान ७५ टक्के किंवा अधिक गुण असल्यास प्रतिवर्षी ५०००/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाते. ७५ टक्के हजेरीबाबतचा शाळेचा दाखला.

नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता १०वी व इयत्ता १२वी मध्ये किमान ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास १०,०००/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य दिले जाते. किमान ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका.

नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता ११वी व इयत्ता १२वी च्या शिक्षणासाठी प्रती शैक्षणिक वर्षी १०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते. इयत्ता १०वी व १२वी ची गुणपत्रिका.

नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी २०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती / बोनाफाईड.

नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेण्यासाठी, पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इत्यादीसाठी प्रती शैक्षणिक वर्षी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरीता १ लाख रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरीता ६०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती / बोनाफाईड.

नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना शासनमान्य पदविकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रती शैक्षणिक वर्षी २००००/- रुपये आणि पदव्युतर पदवीका मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रती शैक्षणिक वर्षी २५,०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती / बोनाफाईड.

संगणकाचे शिक्षण (MS-CIT) घेत असलेल्या नोंदणीकृत लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना, शुल्काची परीपुर्ती, तथापि MS-CIT उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास सदर शुल्काची प्रतिपुर्तीसाठी करण्यात येते. ( MSCIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / शुल्क पावती)
नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप करण्यात येतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

  प्रत्येक मराठ्यापर्यंत ही कविता पोहोचलीच पाहिजे त्याशिवाय मराठ्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही. मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय? का...