राज्यामध्ये प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण भागातील कार्यन्वयीन यंत्रणेकडून ऑनलाईन राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
या योजनेमध्ये सहभागी होऊ मंडळाच्या पटलावरील उद्योगासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी, कारागिरांनी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करावेत. याबाबत अधिक माहितीसाठी मंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेसाठी आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, अर्जदाराचा पासपोर्ट फोटो, जातीचा दाखला, लोकसंख्येचा दाखला, प्रोजेक्ट रिपोर्ट, शपथपत्र (विहित नमुन्यात) व स्कोअर कार्डसाठीचे आवश्यक कागदपत्र अर्जासोबत जोडावीत. कर्ज मर्यादा व प्रक्रिया घटक रक्कम रुपये 50 लक्ष व सेवा उद्योग घटक रूपये 20.00 लक्ष असून www.pmegp.online या संकेतस्थळावरही अधिक माहिती उपलब्ध आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, अर्जदाराचा पासपोर्ट फोटो, जातीचा दाखला, लोकसंख्येचा दाखला, प्रोजेक्ट रिपोर्ट, तहसीलदार यांचे राहिवाशी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, विहित नमुन्यात शपथपत्र (सदरहू शपथपत्र ऑनलाईन फॉर्ममध्ये जोडलेले आहे), लोकसंख्या दाखला आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत. कर्ज मर्यादा उत्पादन व प्रक्रिया घटक रक्क्म रूपये 25.00 लक्ष सेवा उद्योग घटक रक्कम रूपये 10 लक्ष असून योजनेची वेबसाईट maha.cmegp.gov.in आहे, असेही त्यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा