रविवार, १० सप्टेंबर, २०२३

मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

 प्रत्येक मराठ्यापर्यंत ही कविता पोहोचलीच पाहिजे त्याशिवाय मराठ्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही.



मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

काठ्या मारल्या डोके फोडली

माय बहिणीची इज्जत काढली

तुम्हाला काहीच  कसं वाटत नाय ?

मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

जोवर तुमच्या घरात होतं

तोवर तुम्ही दान दिलं

दानधर्म अन् दक्षिणा देण्यात

आयुष्य तुमचं वाया गेलं

भेदाभेद कधीच केला नाही

जीवापाड जपलं तुम्ही

आता तुम्हाला गरज असताना

घेतो का कोणी तुमची हमी

तुमचेच नेते तुमचे ओढून राहिले पाय

तुम्हाला काहीच कसं वाटत नाय ?

मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

रस्त्यावर येऊन बसा 

हायवे करा जाम

चार दिवस  बाजूला ठेवा 

थोडं आपलं काम

बैल ढोरं ट्रॅक्टर ट्रॉली

आणून ठेवा चौकात

लोकशाही मार्गाने प्रशासनाच्या 

दम आणू नाकात

तोडफोड जाळपोळ

अजिबात करायची नाही

आपल्यातल्या म्होरक्यांना मात्र 

अजिबात सोडवायचं नाही

मग पहा कसे सारे

 वठणीवर येतात

एका झटक्यात आरक्षण

पहा कसं देतात

जोपर्यंत तुम्ही इरेला पेटत नाय

मायच्यानं तुम्हाला खरच सांगतो

आरक्षण भेटत नाय

तुम्हाला काहीच कसं वाटत नाय?

मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

आरक्षण नसलं तर पोरांना मागाव लागंल भीक

आरक्षण आसल तर म्हणता येईल कॉलेजात शिक

ज्ञानी झालं पोट्टं तर फसवणूक होणार नाही

शिकलेलं डोकं कधीच गुलाम होऊन राहणार नाही

पूजापाठ कर्मकांड करून टाका बंद

जप तपाऐवजी जडू द्या पुस्तकाचा छंद

सर्वात सोपा मार्ग सांगतो हरिपाठ म्हणा

संतांनी सांगितला मार्ग तोच सत्य जाणा

पेटून उठा एकदाचं हाती घेऊन मशाल

रस्त्यावर येऊन बसाल तरच तुम्ही वाचाल

भविष्याच्या चिंतेबद्दल तुम्हाला

काहीच कसं वाटत नाय

मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

ही संधी हुकली तर आरक्षण विसरा

तीन तिघाडा काम बिघाडा हातात येईल धतुरा

म्हणून सांगतो सगळ्यांनी एकत्र यायचं

आरक्षण कसं भेटत नाही तेच आता पाहायचं

आत्महत्या करून स्वतः मरून आरक्षण भेटणार नाही

रस्त्यावरच्या लढाईशिवाय वादळ आता उठणार नाही

समृद्धी असो की हायवे चौकाचौकात बसा

करा आपला आक्रोश उपोषणाला बसा

सरकारी गेंड्यांना त्याशिवाय कळणार नाही

आरक्षणाचं दळण त्याशिवाय संपणार नाही

तुम्हीच ठरवा मित्रांनो आता काय करायचं ?

मर्दासारखं मरायचं की षंढ होऊन जगायचं ?

मुडद्यासारखं बसून 

पोट आपलं भरणार काय ?

तुम्हाला काहीच कसं वाटत नाय ?

मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

आपल्या सर्व बांधवांपर्यंत ही कविता गेलीच पाहिजे. त्याशिवाय जागृती होणार नाही शेअर करायला विसरू नका.

डॉ. ललित आधाने छ. संभाजीनगर

४२२७४२८६५

बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३

बाल संगोपन योजनेचा असा घ्या लाभ...!


 बालसंगोपन योजनेत एकल पालकांच्या मुलांना मिळतात दर महिन्याला २२५० रुपये संपुर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत.

आजच्या लेखात आपण बालसंगोपन योजनेची संपुर्ण माहिती बघणार आहोत . मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती आहे गरजूंना शेअर करावी ही विनंती.

बालसंगोपन योजना ही एकल पालकांच्या मुलांसाठी राबवली जाते.या योजनेत कालपर्यंत ११०० रुपये मिळत होते .ते आज एक एप्रिल पासून  २२५० रू मिळणार आहेत. तेव्हा आपल्या आजूबाजूच्या विधवा महिला व अनाथ बालकांना ही योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.


 ही योजना कोणाला मिळते..?

एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले  आहेत अशा एक पालक असलेल्या मुलांना, कॅन्सर किंवा HIV बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना, तुरुंगात असलेल्या कैद्याच्या मुलांना ही योजना मिळते.


 वयाची अट काय आहे ? 

अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला दोघानाही प्रत्येकी २२५०रुपये मिळतात. त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावेत.


 यासाठी उत्पन्न अट किती आहे ?

पालकाचे उत्पन्न एक लाख रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे

 घटस्फोटित व परित्यक्ता महिलांच्या मुलांना हा लाभ मिळतो का ?

होय,कारण त्या एकल महिला असल्याने नक्की लाभ मिळतो फक्त घटस्फोटित महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदत्रांसह अर्ज करावा तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहेत त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र सादर करावेत.


 अर्ज घेवून कोठे जावे ?

अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी यांचेकडून तपासून घ्यावा व जिल्ह्याच्या गावी बालकल्याण समिती समोर सोबत मुलांना नेऊन फॉर्म जमा करावा.  बालकल्याण समिती कार्यालय शक्यतो मुलांच्या अभिरक्षण गृहात असते.सोबत ज्यांचा फॉर्म भरला आहे त्या मुलांना सोबत नेणे सक्तीचे आहे.


 अर्जाला कोणती कागदपत्र जोडणे आवश्यक आहे ? 

याचा छापील अर्ज कुटुंब संरक्षण अधिकारी यांचेकडून घ्यावा 

१) योजनेसाठीचा विहीत नमुन्यातील अर्ज           

२)पालकाचे व बालकाचे  आधारकार्ड  झेराँक्स 

३) मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट

४) तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.

५) पालकांचे मृत्यू असल्यास मृत्युचा दाखला

६) पालकाचा रहिवासी दाखला. 

(ग्रामपंचायत /नगरपालिका यांचा)

७) मुलांचे बॅक पासबुक झेराँक्स व ते नसल्यास पालकांचे पासबुक

८) मृत्यूचा अहवाल - ( कोविडने जर मृत्यु झाला असेल तर मृत्युचा अहवाल)

९) रेशनकार्ड झेराँक्स .

१०) घरासमोर पालकासोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड  मापाचा रंगीत फोटो ( दोन मुले असल्यास दोन्ही  मुलासोबत पालकाचा स्वतंत्र फोटो )

१०) मुलांचे ३ पासपोर्ट फोटो


दरवर्षी या योजनेचे नूतनीकरण करणे आवश्यक असते हे लक्षात ठेवावे.


आपल्या परिचयाच्या या निकषात बसणाऱ्या मुलांच्या एकल पालकांना ही योजना समजावून सांगा व ही योजना मिळवून द्यायला मदत करावी. दोन मुले असतील तर दर महिन्याला ४५००रुपये या मुलांना शिक्षणासाठी मिळू शकतील..

या योजनेचा जास्तीत जास्त प्रसार करावा.

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

मराठ्यांनो सुधरारे आतातरी...?


          

मराठ्यांनो सुधरारे आतातरी...!

 तुम्ही आमच्यावर लाठीचार्ज करा, डोके फोडा ,आमच्या महिलांवर काठ्या मारा, तरी आम्ही तुमच्या ताटाखालचे मांजर बनून तुमची चाटत राहू,तुम्हीच आमचे दैवत म्हणून आयुष्यभर मिरवत राहू, तुमच्या वाढदिवसाला वर्गणी करून बॅनर लावू, तुमच्या सभा वावर विकून पार पाडू, कितीही केलं तर तुम्ही आमचे दुसरे बापच आहात, तुमचे पाय चाटत राहू...!!


पण पण पण...


एक स्वाभिमानी मराठा अजून जिवंत आहे, ज्वालामुखीच्या तोंडातून उसळणाऱ्या लाव्हासारखा अजूनही अभेद्य आहे, ज्याच्या रक्तात शिवराय नावाचं बीज वटवृक्षासारखं वाढत आहेय, मूठभर मराठ्यांनी फक्त एक स्वप्न बघितलं होतं स्वराज्याचं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याने रक्ताचे पाट वाहिले होते स्वताचेही आणि दुष्मनांचेही आणि समुद्रा एवढ्या अफाट ताकद असणाऱ्या औरंग्याच्या साम्राज्याला याच मराठ्यांनी सुरुंग लावला होता आणि म्हणून लक्षात ठेवा आज तुम्ही ज्याच्यावर लाठीचार्ज करत आहात, त्यांच्या धमन्यात त्याच मावळ्यांच रक्त वाहत आहे. म्हणून हलक्यात घेऊ नका, शांततेत चालू असणाऱ्या मोर्चावर लाठीचार्ज करता तोच मराठा जेव्हा रौद्ररूप धारण करेल तेव्हा तुम्हाला गुडघ्यावर बसवल्या शिवाय राहणार नाही...!!


आरक्षण आमच्या हक्काचं नाही तुमच्या बापाचं...!!


मराठा समाजावर होणारा लाठीचार्ज बघूनही, नेत्यांचे तळवे चाटणाऱ्या, मराठा नावाला कलंक असणाऱ्या काही बाजारू कार्यकर्त्यांचा जाहीर निषेध, आता तरी मराठा असाल तर एकत्र या आणि सरकार ला आपली ताकद दाखवून द्या...!!


मनोज जरांगे पाटलांसोबत एकजुटीने उभे रहा.!!

मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

  प्रत्येक मराठ्यापर्यंत ही कविता पोहोचलीच पाहिजे त्याशिवाय मराठ्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही. मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय? का...