रविवार, १० सप्टेंबर, २०२३

मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

 प्रत्येक मराठ्यापर्यंत ही कविता पोहोचलीच पाहिजे त्याशिवाय मराठ्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही.



मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

काठ्या मारल्या डोके फोडली

माय बहिणीची इज्जत काढली

तुम्हाला काहीच  कसं वाटत नाय ?

मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

जोवर तुमच्या घरात होतं

तोवर तुम्ही दान दिलं

दानधर्म अन् दक्षिणा देण्यात

आयुष्य तुमचं वाया गेलं

भेदाभेद कधीच केला नाही

जीवापाड जपलं तुम्ही

आता तुम्हाला गरज असताना

घेतो का कोणी तुमची हमी

तुमचेच नेते तुमचे ओढून राहिले पाय

तुम्हाला काहीच कसं वाटत नाय ?

मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

रस्त्यावर येऊन बसा 

हायवे करा जाम

चार दिवस  बाजूला ठेवा 

थोडं आपलं काम

बैल ढोरं ट्रॅक्टर ट्रॉली

आणून ठेवा चौकात

लोकशाही मार्गाने प्रशासनाच्या 

दम आणू नाकात

तोडफोड जाळपोळ

अजिबात करायची नाही

आपल्यातल्या म्होरक्यांना मात्र 

अजिबात सोडवायचं नाही

मग पहा कसे सारे

 वठणीवर येतात

एका झटक्यात आरक्षण

पहा कसं देतात

जोपर्यंत तुम्ही इरेला पेटत नाय

मायच्यानं तुम्हाला खरच सांगतो

आरक्षण भेटत नाय

तुम्हाला काहीच कसं वाटत नाय?

मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

आरक्षण नसलं तर पोरांना मागाव लागंल भीक

आरक्षण आसल तर म्हणता येईल कॉलेजात शिक

ज्ञानी झालं पोट्टं तर फसवणूक होणार नाही

शिकलेलं डोकं कधीच गुलाम होऊन राहणार नाही

पूजापाठ कर्मकांड करून टाका बंद

जप तपाऐवजी जडू द्या पुस्तकाचा छंद

सर्वात सोपा मार्ग सांगतो हरिपाठ म्हणा

संतांनी सांगितला मार्ग तोच सत्य जाणा

पेटून उठा एकदाचं हाती घेऊन मशाल

रस्त्यावर येऊन बसाल तरच तुम्ही वाचाल

भविष्याच्या चिंतेबद्दल तुम्हाला

काहीच कसं वाटत नाय

मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

ही संधी हुकली तर आरक्षण विसरा

तीन तिघाडा काम बिघाडा हातात येईल धतुरा

म्हणून सांगतो सगळ्यांनी एकत्र यायचं

आरक्षण कसं भेटत नाही तेच आता पाहायचं

आत्महत्या करून स्वतः मरून आरक्षण भेटणार नाही

रस्त्यावरच्या लढाईशिवाय वादळ आता उठणार नाही

समृद्धी असो की हायवे चौकाचौकात बसा

करा आपला आक्रोश उपोषणाला बसा

सरकारी गेंड्यांना त्याशिवाय कळणार नाही

आरक्षणाचं दळण त्याशिवाय संपणार नाही

तुम्हीच ठरवा मित्रांनो आता काय करायचं ?

मर्दासारखं मरायचं की षंढ होऊन जगायचं ?

मुडद्यासारखं बसून 

पोट आपलं भरणार काय ?

तुम्हाला काहीच कसं वाटत नाय ?

मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

आपल्या सर्व बांधवांपर्यंत ही कविता गेलीच पाहिजे. त्याशिवाय जागृती होणार नाही शेअर करायला विसरू नका.

डॉ. ललित आधाने छ. संभाजीनगर

४२२७४२८६५

बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३

बाल संगोपन योजनेचा असा घ्या लाभ...!


 बालसंगोपन योजनेत एकल पालकांच्या मुलांना मिळतात दर महिन्याला २२५० रुपये संपुर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत.

आजच्या लेखात आपण बालसंगोपन योजनेची संपुर्ण माहिती बघणार आहोत . मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती आहे गरजूंना शेअर करावी ही विनंती.

बालसंगोपन योजना ही एकल पालकांच्या मुलांसाठी राबवली जाते.या योजनेत कालपर्यंत ११०० रुपये मिळत होते .ते आज एक एप्रिल पासून  २२५० रू मिळणार आहेत. तेव्हा आपल्या आजूबाजूच्या विधवा महिला व अनाथ बालकांना ही योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.


 ही योजना कोणाला मिळते..?

एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले  आहेत अशा एक पालक असलेल्या मुलांना, कॅन्सर किंवा HIV बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना, तुरुंगात असलेल्या कैद्याच्या मुलांना ही योजना मिळते.


 वयाची अट काय आहे ? 

अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला दोघानाही प्रत्येकी २२५०रुपये मिळतात. त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावेत.


 यासाठी उत्पन्न अट किती आहे ?

पालकाचे उत्पन्न एक लाख रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे

 घटस्फोटित व परित्यक्ता महिलांच्या मुलांना हा लाभ मिळतो का ?

होय,कारण त्या एकल महिला असल्याने नक्की लाभ मिळतो फक्त घटस्फोटित महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदत्रांसह अर्ज करावा तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहेत त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र सादर करावेत.


 अर्ज घेवून कोठे जावे ?

अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी यांचेकडून तपासून घ्यावा व जिल्ह्याच्या गावी बालकल्याण समिती समोर सोबत मुलांना नेऊन फॉर्म जमा करावा.  बालकल्याण समिती कार्यालय शक्यतो मुलांच्या अभिरक्षण गृहात असते.सोबत ज्यांचा फॉर्म भरला आहे त्या मुलांना सोबत नेणे सक्तीचे आहे.


 अर्जाला कोणती कागदपत्र जोडणे आवश्यक आहे ? 

याचा छापील अर्ज कुटुंब संरक्षण अधिकारी यांचेकडून घ्यावा 

१) योजनेसाठीचा विहीत नमुन्यातील अर्ज           

२)पालकाचे व बालकाचे  आधारकार्ड  झेराँक्स 

३) मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट

४) तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.

५) पालकांचे मृत्यू असल्यास मृत्युचा दाखला

६) पालकाचा रहिवासी दाखला. 

(ग्रामपंचायत /नगरपालिका यांचा)

७) मुलांचे बॅक पासबुक झेराँक्स व ते नसल्यास पालकांचे पासबुक

८) मृत्यूचा अहवाल - ( कोविडने जर मृत्यु झाला असेल तर मृत्युचा अहवाल)

९) रेशनकार्ड झेराँक्स .

१०) घरासमोर पालकासोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड  मापाचा रंगीत फोटो ( दोन मुले असल्यास दोन्ही  मुलासोबत पालकाचा स्वतंत्र फोटो )

१०) मुलांचे ३ पासपोर्ट फोटो


दरवर्षी या योजनेचे नूतनीकरण करणे आवश्यक असते हे लक्षात ठेवावे.


आपल्या परिचयाच्या या निकषात बसणाऱ्या मुलांच्या एकल पालकांना ही योजना समजावून सांगा व ही योजना मिळवून द्यायला मदत करावी. दोन मुले असतील तर दर महिन्याला ४५००रुपये या मुलांना शिक्षणासाठी मिळू शकतील..

या योजनेचा जास्तीत जास्त प्रसार करावा.

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

मराठ्यांनो सुधरारे आतातरी...?


          

मराठ्यांनो सुधरारे आतातरी...!

 तुम्ही आमच्यावर लाठीचार्ज करा, डोके फोडा ,आमच्या महिलांवर काठ्या मारा, तरी आम्ही तुमच्या ताटाखालचे मांजर बनून तुमची चाटत राहू,तुम्हीच आमचे दैवत म्हणून आयुष्यभर मिरवत राहू, तुमच्या वाढदिवसाला वर्गणी करून बॅनर लावू, तुमच्या सभा वावर विकून पार पाडू, कितीही केलं तर तुम्ही आमचे दुसरे बापच आहात, तुमचे पाय चाटत राहू...!!


पण पण पण...


एक स्वाभिमानी मराठा अजून जिवंत आहे, ज्वालामुखीच्या तोंडातून उसळणाऱ्या लाव्हासारखा अजूनही अभेद्य आहे, ज्याच्या रक्तात शिवराय नावाचं बीज वटवृक्षासारखं वाढत आहेय, मूठभर मराठ्यांनी फक्त एक स्वप्न बघितलं होतं स्वराज्याचं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याने रक्ताचे पाट वाहिले होते स्वताचेही आणि दुष्मनांचेही आणि समुद्रा एवढ्या अफाट ताकद असणाऱ्या औरंग्याच्या साम्राज्याला याच मराठ्यांनी सुरुंग लावला होता आणि म्हणून लक्षात ठेवा आज तुम्ही ज्याच्यावर लाठीचार्ज करत आहात, त्यांच्या धमन्यात त्याच मावळ्यांच रक्त वाहत आहे. म्हणून हलक्यात घेऊ नका, शांततेत चालू असणाऱ्या मोर्चावर लाठीचार्ज करता तोच मराठा जेव्हा रौद्ररूप धारण करेल तेव्हा तुम्हाला गुडघ्यावर बसवल्या शिवाय राहणार नाही...!!


आरक्षण आमच्या हक्काचं नाही तुमच्या बापाचं...!!


मराठा समाजावर होणारा लाठीचार्ज बघूनही, नेत्यांचे तळवे चाटणाऱ्या, मराठा नावाला कलंक असणाऱ्या काही बाजारू कार्यकर्त्यांचा जाहीर निषेध, आता तरी मराठा असाल तर एकत्र या आणि सरकार ला आपली ताकद दाखवून द्या...!!


मनोज जरांगे पाटलांसोबत एकजुटीने उभे रहा.!!

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

बहिणींना केंद्र सरकारकडून रक्षाबंधनानिमित्त भेट खरी की खोटी...?


बहिणींना केंद्र सरकारकडून रक्षाबंधनानिमित्त भेट मिळणारी खरी की खोटी...?



 रक्षाबंधनानिमित्त केंद्र सरकारची बहिणींना 3000 रुपयांची भेट? पीआयबी फॅक्ट चेक: वास्तविक, अधिकृत तथ्य तपासणी वेबसाइट पीआयबीने या प्रकरणाचा खुलासा केला आहे. यासोबतच पीआयबीच्या तपासात धक्कादायक खुलासाही झाला आहे.

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मोदी सरकारने भगिनी आणि महिलांना मोठी भेट दिल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, मोदी सरकार रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना 3000 रुपये देण्याची घोषणा करत आहे. यानंतर लोक त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया विचारत आहेत.

आता प्रश्न असा आहे की, तुम्हीही अशी पोस्ट पाहिली आहे का? तुम्ही हे पाहिले असेल तर आताच सावध व्हा. खरं तर, अधिकृत तथ्य तपासणी वेबसाइट पीआयबीने या प्रकरणाचा खुलासा केला आहे. यासोबतच पीआयबीच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट दिली आहे. संसदेत महिलांसाठी विशेष योजनेचा दावा करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. याअंतर्गत महिलांच्या खात्यात सरकार दरमहा तीन हजार रुपये जमा करणार आहे. लाडली योजनेचेही नाव दाव्यात आहे. पण हे सर्व खोटे आहे. केंद्रातील मोदी सरकारने संसदेत अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही, असे पीआयबी फॅक्ट चेकमध्ये आढळून आले.

15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून दहाव्यांदा भाषण केले तेव्हा त्यांनी अशी कोणतीही योजना जाहीर केली नाही. तसेच, भविष्यात अशी कोणतीही योजना त्यांनी उघड केलेली नाही. विशेष म्हणजे पीआयबीच्या तथ्य तपासणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा कोणत्याही बनावट पोस्टवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पीआयबीने केले आहे.

मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली लाडली योजना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान चालवत आहेत. मध्य प्रदेशमध्ये महिलांच्या खात्यात 3000 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सरकार दरमहा एक हजार रुपये देते. रक्षाबंधन सणाच्या दिवशी ते 1250 रुपये करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यासोबतच या योजनेसाठी नोंदणीही सुरू आहे.

शनिवार, १ एप्रिल, २०२३

अधिकाऱ्याने पैसे मागितल्यावर पठ्याने काय केले बघा.

 ग्रेट सरपंच.......!




 फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचा सरपंच वय फक्त 30 वर्ष नावं मंगेश साबळे गावातल्या शेतकऱ्याला विहिरीसाठी बिडीओ ने पैसे मागितले म्हणून थेट पंचायत समिती गाठून गळ्यात 2 लाख रुपये घेऊन ते अधिकाऱ्यांच्या दालनासमोर फिडकवणारा महाराष्ट्र राज्यातला एकमेव वाघ तुझं कौतुक संबंध शेतकरी भावांनी केलच आणि तो अधिकारी अखेर बडतर्फ सुद्धा झाला. 


हा खऱ्या अर्थाने तुझा विजय आहे. एक प्रामाणिक काम करणारा सरपंच म्ह्णून तू जन माणसात नावं कोरलस, नक्कीच येणारा काळ हा तुझा असेल आणि तुझा आदर्श प्रत्येक गावातल्या सरपंचांनी घ्यावा एवढंच या निमित्त...! 

तुझे सर्व शेतकरी बांधव आणि आमच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद..!

असच कायम लढत रहा...!!

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी सूचना हे करा नाहीतर 50 हजार रुपये मिळणार नाहीत..!

 


महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित परतफेड केल्यामुळे ५० हजाराच्या प्रोत्साहनपर लाभास पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर. ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्जखाते पासबुक व बचतखाते पासबुक घेऊन नजीकच्या 'आपले सरकार सेवा केंद्र' किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घेण्याचे आवाहन सहकार मंत्री अतुल सावे यांनी केले.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर या तारखेला होणार पंतप्रधान किसान योजनेचा हप्ता जमा...!


 शेतकऱ्यांसाठी खुशखबर या तारखेला होणार पंतप्रधान किसान योजनेचा हप्ता जमा...!

पीएम किसान योजनेचा पुढचा म्हणजेच बारावा हफ्ता 17 किंवा 18 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार.

अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबास मिळणार 2 लाखांची मदत कशी मिळवायची या विषयी सविस्तर माहिती...!

 

अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबास मिळणार 2 लाखांची मदत

 


शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अनेक वेळा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तीमूळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बरेच शेतकरी यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते.

अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेमधून नुकसान भरपाई दिली जाणार आहे. खालील प्रमाणे मदत दिली जाणार आहे. सर्व शेतकरी यांची विमा हप्त्याची रक्कम शासनामार्फत विमा कंपनीस भरण्यात येते. त्यामुळे शेतकरी यांनी विमा हप्ता भरण्याची गरज नाही. याअंतर्गत शेतकर्‍यांना खालील प्रमाणे नुकसान भरपाई मिळते.

 

नुकसान भरपाईची रक्कम:


अपघाती मृत्यू- रु.२ लाख.
अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.२ लाख अपघातामुळे १ डोळा अथवा १ हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.१ लाख.

 

लाभ घेण्याकरीता दावा दाखल करताना सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे


१. ७/१२ उतारा किंवा ८अ.(मुळ प्रत)
२. मृत्यू दाखला (स्वयं साक्षांकीत प्रत)
३. प्रथम माहिती अहवाल
४. विजेचा धक्का अपघात, विज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरुन पडून झालेला मृत्यू, सर्प दंश/ विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलिस पाटील अहवाल.
५. घटनास्थळ पंचनामा
६. जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र/ ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र किंवा पारपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र. वयाचा दाखला (नसल्यास शपथपत्र)
७. खातेदार शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका (राजपत्रित अधिकारी यांनी सांक्षाकीत केलेली)

 

आ) प्रस्तावा सोबत सादर करावयाची आवश्यक कागद पत्रे :


१. ज्या नोंदी वरुन अपघातग्रस्त शेतक-याचे नाव ७/१२ वर आले असेल अशी संबंधीत फेरफार नोंद (गाव नमुना नं.६ ड) मुळ उतारा अथवा फेर फार नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिका-याने दिलेले प्रमाणपत्र.
२. शेतकऱ्याचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्या कडील गाव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. मुळ उतारा अथवा वारसाच्या नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिकार्‍याने दिलेले प्रमाणपत्र.
३. विहित नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र (प्रपत्र-ग).

 

अर्ज कोठे करावा- तालुका कृषी अधिकारी कार्यालयात.


विमा कंपनी : युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
टोल फ्री नंबर-१८०० २२ ४०३०
विमा सल्लागार कंपनी (ब्रोकर) :- मे.ऑक्झिलियम इन्शुरंन्स ब्रोकींग प्रा.लि.
प्लॉट ने.६१/४, सेक्टर-२८, प्लाझा हट च्या पाठीमागे,वाशी, नवी मुंबई- ४००७०३
दुरध्वनी क्रमांक-०२२-२७६५००९६, टोल फ्री क्रमांक – १८०० २२० ८१२

source : krishijagran

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२

रेशनकार्ड धारकांना खुशखबर... दिवाळी होणार गोड.

 राज्यातील रेशनकार्डधारकांना १०० रुपयांत दिवाळी सणासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू देण्यात येणार आहेत. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 


या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पॅकेजबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. राज्यातील रेशनकार्डधारकांना १०० रुपयांत दिवाळी सणासाठी आवश्यक असणान्या वस्तू देण्यात येणार आहेत. शरद पवारांनी दोन वाक्यात विषयच संपवला म्हणाले दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना केवळ १०० रुपयांत शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना रवा, चणाडाळ, साखर प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर पामतेल यांचा समावेश असेल. 




राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे सात कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ४८६ कोटी ९४ लाख खर्चासदेखील मान्यता देण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या इतरही निर्णयांची माहिती दिली. पोलिसांसाठी देण्यात येणारी हाऊसिंग लोन योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 


यामुळे राज्यातील पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय भंडारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प सुधारणेला मान्यता दिली आहे. याचा मराठवाड्यातील दुष्काळी तालुक्यांना फायदा होणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

अपंगांना सर्व योजनांचा लाभ घेता येण्यासाठी हे पोर्टल सुरू...!


 


अपंग व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाचे पोर्टल...!

देशातील अपंग नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांकडून निरंतर प्रयत्न केले जातात. अपंग नागरिकांच्या मदतीसाठी अनेक पोर्टल सरकारने सुरू केले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका Maha Sharad Portal नावाच्या पोर्टलशी संबंधित माहिती देणार आहोत. हा लेख वाचून आपल्याला या पोर्टलशी संबंधित सर्व महत्वाची माहिती मिळेल. महा शरद पोर्टल म्हणजे काय? त्याचे फायदे, उद्दीष्ट, वैशिष्ट्ये, पात्रता, महत्वाची कागदपत्रे, अर्जाची प्रक्रिया इ. तर मित्रांनो, जर तुम्हाला Maha Sharad Portal संबंधित सर्व महत्वाची माहिती घ्यायची असेल तर शेवटपर्यंत आमचा हा लेख वाचावा.

Maha Sharad Portal 2022

महाराष्ट्र शासनाने राज्यातील अपंग नागरिकांसाठी Maha Sharad Portal सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग नागरिकांसाठी एक व्यासपीठ तयार केले जाईल. जेणेकरून राज्यातील सर्व दिव्यांग नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. अपंग नागरिकांची नोंदणी करणे हे Sharad Portal चे मुख्य उद्दीष्ट आहे जेणेकरुन सर्व देणगीदार महा शरद पोर्टलच्या माध्यमातून विविध अपंग व्यक्तींना त्यांची मदत आणि पाठबळ देऊ शकतील. 

Maha Sharad Portal Registration

या पोर्टलच्या माध्यमातून अपंग लोकांची स्थिती व गरजा समजून घेण्याचेही प्रयत्न केले जातात. या पोर्टलच्या माध्यमातून सर्व स्वयंसेवी संस्था, समाजसेवक, देणगीदार इत्यादी दिव्यांगची स्थिती समजून घेण्यास आणि त्यांना मदत करण्यास सक्षम असतील. Maha Sharad Portal च्या माध्यमातून राज्यातील अपंग नागरिकांना आर्थिक मदत केली जाईल जेणेकरून त्यांना इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. या पोर्टलवर अर्ज करणे खूप सोपे आहे. सर्व दिव्यांग नागरिकांनी लवकरात लवकर महा शरद पोर्टलवर नोंदणी करावी व या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. देणगीदार देखील या पोर्टलवर नोंदणी करू शकतात. दिव्यांग नागरिकांशी संबंधित सर्व माहिती Maha Sharad Portal वर उपलब्ध आहे.

महा शरद पोर्टल चा उद्देश

पोर्टलवर सर्व दिव्यांग नागरिकांची नोंदणी करणे हे Maha Sharad Portal चे मुख्य उद्दीष्ट आहे. जेणेकरुन सर्व सरकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. या पोर्टलच्या माध्यमातून देणगीदार वेगवेगळ्या दिव्यांग नागरिकांना मदत देऊ शकतात, Maha Sharad Portal च्या माध्यमातून सरकार अपंग नागरिकांना आर्थिक सहाय्य करेल. जेणेकरुन अपंग नागरिक स्वावलंबी होतील. या पोर्टलच्या अंतर्गत स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या सक्षम नागरिकांना त्यांची मदत देखील देतील. आता राज्यातील कोणताही अपंग नागरिक इतरांवर अवलंबून राहणार नाही.

Maha Sharad Portal फायदे आणि वैशिष्ट्ये

  • हे पोर्टल महाराष्ट्रातील अपंग नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे.

  • या पोर्टलवर सर्व दिव्यांग नागरिक नोंदणी करू शकतात.

  • Maha Sharad Portal च्या माध्यमातून सर्व नोंदणीकृत  अपंग नागरिकांना शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ दिला जाईल.

  • देणगीदार या पोर्टलद्वारे स्वत: ची नोंदणी देखील करू शकतात. ज्याद्वारे ते अपंग नागरिकांपर्यंत पोहोचू शकतील.

  • या पोर्टलवर नोंदणी करणे विनामूल्य आहे.

  • महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहितीही महा शरद पोर्टलमार्फत देण्यात येईल.

  • वेगळ्या अपंग लोकांची स्थिती आणि जागरूकता देखील या पोर्टलद्वारे समजू शकते.

  • Maha Sharad Portal च्या माध्यमातून सरकार अपंगांना आर्थिक सहाय्य करेल जेणेकरून ते स्वावलंबी होतील.

  • महाराष्ट्रातील सर्व अपंग नागरिकांनी लवकरात लवकर या पोर्टलवर अर्ज करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.

Registration साठी लागणारे कागदपत्रे

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा.

  • अर्जदार अपंग असावा.

  • आधार कार्ड

  • पत्ता पुरावा

  • जन्म प्रमाणपत्र

  • अपंगत्व प्रमाणपत्र

  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

  • मोबाइल नंबर

महा शरद पोर्टल ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया

  • महा शरद पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला maha sharad portal च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

    महा शरद

  • तुमच्या समोर मुखपृष्ठ ओपन होईल.

  • मुखपृष्ठावर तुम्हाला दिव्यांग च्या लिंक वर क्लिक करावे लागेल. 

    maha-sharad-portal-apply

  • यानंतर दिव्यांग नोंदणी फॉर्म आपल्यासमोर उघडेल.

  • या फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व माहिती आपल्याला आपले नाव, लिंग, राज्य, पिन कोड, आधार क्रमांक इ. प्रविष्ट कराव्या लागतील.

  • आता तुम्हाला रजिस्टर बटणावर क्लिक करावे लागेल.

  • अशा प्रकारे आपण पोर्टलवर नोंदणी करू शकता.
     Sorce:-krushi yojna

मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय?

  प्रत्येक मराठ्यापर्यंत ही कविता पोहोचलीच पाहिजे त्याशिवाय मराठ्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही. मराठ्यांनो ! तुम्ही बांगड्या भरल्या काय? का...